मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री 9 वाजता संपूर्ण देशवासियांना मेणबत्या आणि दिवे पेटवण्याचं आवाहन केलं आहे. मोदींच्या या आवाहनावर अभिनेता एजाज खानने जोरदार टीका केली आहे.
मोदीजी आपल्याला बिग बॉस खेळवत आहेत. आठवड्यातून एकदा येतात आणि नवा टास्क देऊन जातात, अशी टीका एजाज खान याने नरेंद्र मोदींवर केली आहे. त्याने या संदर्भात एक ट्विट केलं आहे.
सर्व दिवे विझवल्यामुळे कोरोनाला वाटेल आता भारतात कोणीच नाही. त्यामुळे तो भारत सोडून निघून जाईल. धन्यवाद मोदी जी, असं ट्विट करत एजाजने नरेंद्र मोदींवर पुन्ह एकदा निशाणा साधला आहे.
दरम्यान, एजाज खान सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. गेल्या काही काळात तो अभिनयापेक्षा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेच जास्त चर्चेत राहू लागला आहे. त्याने कोरोना विषाणूवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोमणा मारला होता. आता पुन्हा एकदा त्याने मोदींवर निशाणा साधला आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
जनता कर्फ्यूवेळी केलेली ‘ती’ चूक 5 एप्रिलला करू नका- नरेंद्र मोदी
“थाळी-टाळीचे उपक्रम बंद करून आतातरी मोदींनी कोरोनाबाबत गंभीर व्हायला हवं”
महत्वाच्या बातम्या-
मुंबईत डीसीपी रँकचा पोलीस अधिकारी कोरोना संशयित!
नरेंद्र मोदींनी मान्य केला उद्धव ठाकरेंचा ‘हा’ सल्ला, म्हणाले….
‘आता लोकांनी आग लावली नाही म्हणजे झालं’; संजय राऊतांची मोदींवर बोचरी टीका
टेलिग्रामवर सर्व ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच पुढील लिंकवर क्लिक करा- https://t.me/thodkyaatNews
Comments are closed.