Ajinkya Rahane | भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) आपल्या कार खरेदीबद्दल एक खास खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, त्याने आयुष्यात खूप उशिरा कार खरेदी केली आणि तीही सेकंड हँड (Second Hand).
सुरुवातीच्या काळात, अजिंक्य बहुतेकवेळा आविष्कार साळवी (Avishkar Salvi) किंवा प्रवीण तांबे (Pravin Tambe) यांच्याकडे लिफ्ट मागायचा. भारतीय संघाकडून खेळत असताना त्याने सेकंड हँड वॅगनआर (WagonR) खरेदी केली. लोक त्याला मोठी कार घेण्याचा सल्ला देत, पण अजिंक्यचा कल नेहमीच हुशारीने गुंतवणूक करण्याकडे होता.
“…म्हणून आधी सेकंड हँड कार घेतली”
त्याने सांगितले की, ‘सुरुवातीला मी खूप लोकांकडे लिफ्ट मागायचो. भारतीय संघात खेळायला लागल्यावर मी सेकंड हँड वॅगनआर घेतली. तेव्हा अनेकांनी मला मोठी गाडी घेण्याचा सल्ला दिला.’
दोन वर्षांनंतर अजिंक्यने होंडा सिटी (Honda City) खरेदी केली. गरजेनुसार खर्च करण्याच्या आपल्या तत्वामुळेच त्याने आधी सेकंड हँड कार घेतली, असे त्याने सांगितले.
अजिंक्य रहाणेचा (Ajinkya Rahane) हा अनुभव पैसा कसा वापरावा, याबद्दल एक महत्त्वाचा धडा देतो. लगेच मोठी गाडी घेण्याऐवजी, त्याने आधी विचारपूर्वक गुंतवणूक केली आणि नंतर गरजेनुसार मोठी कार खरेदी केली.
Title : Ajinkya Rahane and his Second-Hand Car