देश

मराठी माणसाला अभिमान हवाच! अशी कामगिरी करणारा रहाणे पहिलाच खेळाडू

नवी दिल्ली | अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने मेलबर्न कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर 8 गडी राखून मात केली. अजिंक्य रहाणे व रवींद्र जडेजा यांच्या दमदार फलंदाजीनंतर भारतीय गोलंदाजांनी Boxing Day कसोटीत ऑस्ट्रेलियाला गुडघे टेकण्यास भाग पाडलं.

कर्णधार अजिंक्य रहाणेने पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात नाबाद 27 धावा झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

अजिंक्यला सामन्यानंतर ‘Mullagh Medal’ देण्यात आलं. हे पदक जिंकणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. मराठमोळ्या अजिंक्यने हे मानाचं मेडल पटकावत भारताचं नाव मोठं केलं आहे.

सामन्यातील प्रभावी खेळीसाठी क्रीडा वर्तुळासह सर्वच क्षेत्रांतून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. यावेळी सामन्यातील विजयानंतर अजिंक्य रहाणेनं प्रतिक्रिया देतानाही सर्वांचीच मनं जिंकली. ऑस्ट्रेलियावर मात करण्याचं श्रेय यावेळी अजिंक्यनं संघातील नवोदित खेळाडूंना दिलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मला धमकी देणारा अजून जन्माला यायचाय, जो मला धमकी देईल तो…- संजय राऊत

चिंताजनक! कोरोनाच्या नव्या प्रकाराचा भारतात शिरकाव, 6 जण नव्या विषाणूमुळे बाधित

“लपवाछपवी करणारे घाबरुन भाजपमध्ये जातात; आम्ही शिवसेनेत आहोत, शिवसेनेतच मरणार”

पुणेकरांनो काळजी घ्या; ब्रिटनहून आलेले 109 प्रवाशी बेपत्ता!

“प्रकाश आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्षाशी काही संबंध राहीला नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या