Top News खेळ

‘ही’ माझी सर्वात आवडती ट्रॉफी- अजिंक्य रहाणे

मुंबई | जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. भारतात कोरोनाचा प्रादूर्भाव अधिक दिसून येतोय. यासाठी भारतात सध्या क्रिकेट खेळाला पूर्णविराम लागलाय. त्यामुळे सर्व भारतीय खेळाडू आपापल्या घरी विश्राम घेतायत. अशा कसोटीच्या काळात चाहत्यांशी संपर्क टिकवून ठेवण्यासाठी क्रीडापटू वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करतात. क्रिकेटपटू आपल्या घरातील फोटो पोस्ट करत चाहत्यांशी संपर्क टिकवून ठेवत आहेत.

भारताचा कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने आपल्या घरातील एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये त्याने स्वत:ला मिळालेल्या टॉफी एका शेल्फमध्ये ठेवल्या आहेत. त्यात विविध आकाराच्या छान ट्रॉफीज आहेत. याच शेल्फमध्ये अजिंक्यची चिमुकली मुलगी आर्याही एका कप्प्यात बसलेली आहे.

अजिंक्य रहाणेने इन्स्ट्ग्रामवर हा फोटो शेअर केलाय. या फोटोला कॅप्शन देत अजिंक्य म्हणतो, ‘माझी सर्वात आवडती आणि सर्वोत्तम ट्रॉफी हिच आहे’. यापूर्वीही लॉकडाऊनच्या काळात रहाणेने त्याची मुलगी आर्या सोबतचे अनेक फोटो तसंच व्हिडीओ शेअर केले होते.

अजिंक्य रहाणे आपली मुलगी आणि कुटुंबीयांसोबत रमला आहे. शिवाय तो क्रिकेटला पण मिस करत असल्याचं त्याने सांगितलं होतं.. काही दिवसांपूर्वी अजिंक्यने कर्णधार विराट कोहलीसोबतचा फोटो पोस्ट केला होता. या फोटोखाली अजिंक्यने, ‘आम्ही सारे क्रिकेटपटू आता क्रिकेट स्पर्धा किंवा मालिका सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहात आहोत’, असं लिहिलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

औरंगाबादच्या तरुणाच्या वेबपोर्टलची किमया; कोरोना काळात थेट गुगलनं केली आर्थिक मदत

‘भारताच्या जागतिक धोरणाची लक्तरे झालीयेत’; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

मुलीचं प्रेम बापाला नव्हतं मान्य; पुण्यात प्रियकराची भररस्त्यात गोळ्या घालून हत्या

‘दोन दिवसात उत्तर द्या अन्यथा…’, सचिन पायलट यांना काँग्रेसची नोटीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या