मुंबई | कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जगभर पसरला आहे. त्याचबरोबर तो भारतातही वेगाने वाढत आहे. भारतात थैमान घातलेल्या या व्हायरसला थांबविण्यासाठी क्रिकेट जगतातून मोठ्या प्रमाणावर मदत केली जात आहे. यावेळी भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणेने कोरोनाग्रस्तांसाठी महाराष्ट्र मुख्यमंत्री मदत निधीमध्ये 10 लाख लाखांची मदत केली आहे.
या व्हायरसला नष्ट करण्यासाठी अनेक खेळाडू लोकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करत आहेत. त्याचबरोबर ते आपापल्या परीने होईल ती मदत करत आहेत. आता मदत करणाऱ्यांच्या यादीत भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेचाही समावेश झाला आहे.
भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 50 लाख रुपयांची मदत केला होती. यामध्ये त्याने 25 लाख रुपये पंतप्रधान मदत निधी आणि 25 लाख रुपये मुख्यमंत्री मदत निधीमध्ये दिले आहेत. आत्तापर्यंत निधी दिलेल्या खेळाडूंमध्ये रैनाने सर्वाधिक रक्कम दिली आहे.
दरम्यान, शहरापासून सुरु झालेल्या कोरोना व्हायरसने आतापर्यंत जगभरातील 34000 लोकांचा जीव घेतला आहे. भारतातील 25 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 1034 लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
केंद्र सरकार लॉकडाऊनचा काळ वाढवेल काय? शरद पवार म्हणतात…
महत्वाच्या बातम्या-
“माफ करा आम्हाला, पोलीस आणि डॉक्टरांनो आमचा आत्मा मेला आहे”
नमाजसाठी इमारतीच्या छतावर गर्दी; 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
याला म्हणतात बंधुता! हिंदू व्यक्तीच्या अंत्यसंस्कारावेळी मुस्लीम बांधवांनी दिला खांदा
Comments are closed.