मेलबर्न | विराट कोहलीच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची कामगिरी कशी होईल यावर प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र कर्णधार अजिंक्य रहाणेने आज त्याच्या खेळीतून या सर्व प्रश्नांची उत्तर देत ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर कांगारूना बेजार केलंय.
अजिंक्य रहाणेने ऐतिहासिक बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा सामना करत शानदार शतक झळकावलंय. तसंच टीम इंडियाला पहिल्या डावात चांगली आघाडी देखील मिळवून दिली आहे.
कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जडेजा यांनी चांगली भागिदारी केली. कसोटी सामन्यामधील अजिंक्य रहाणेचं हे 12वं शतकं ठरलं.
यापूर्वी देखील 2014 मध्ये रहाणेने बॉक्सिंग डे टेस्टमध्ये शतक ठोकलं होतं. अजिंक्य शिवाय सचिन, सेहवाग, पुजारा, कोहली यांनी शतकं केली आहेत.
थोडक्यात बातम्या-
“भारत भालकेंच्या जागेवर पार्थ पवार यांना संधी द्या”
नव्या वर्षात देशासाठी ‘हा’ संकल्प करा- नरेंद्र मोदी
एसटीचा प्रवास आता होणार अधिक वेगवान; घेतला ‘हा’ मोठा निर्णय!
“चंद्रकांतदादांचे पक्षांतर्गत विरोधक म्हणजे देवेंद्र फडणवीसच”
धनगर आरक्षणावरुन जयंत पाटलांचा भाजप सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले…