बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आदित्य ठाकरेंवर अजिंक्य राहणेचा कौतुकाचा वर्षाव, म्हणाला…

मुंबई |  पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा 30 वा वाढदिवस आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने देखील आदित्य यांना त्यांच्या वाढदिवसादिनी खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आदित्य. तु महाराष्ट्रासाठी घेत असलेले कष्ट पाहून आम्हाला तुझा अभिमान वाटतो. तुला हे वर्ष सुखसमृद्धीचे जावो, अशा आशयाचं ट्विट करत रहाणेने आदित्य ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच शिवसैनिकांनी असतील त्या ठिकाणाहूनच शुभेच्छा देण्याची विनंती त्यांनी केली आहे.

माझी तमाम शिवसैनिक, मिंत्रमंडळी आणि सर्वांना विनंती आहे की होर्डिंग्ज, हार तुरे, केक हा सर्व खर्च टाळून तुम्ही करोनाच्या संकटात अडकलेल्या लोकांवर खर्च करा अथवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीला द्या, माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे एक सत्कार्य होईल आणि याचा मला निश्चितच आनंद होईल असंही त्यांनी म्हटलं आहे.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

संवेदनशील छत्रपती; बळीराजाचं दुःख न पाहवल्याने राजेंनी स्वतः तिफन ओढली! पाहा व्ही़डिओ

सरकारचा खासगी लॅबला दणका; कोरोना चाचणीच्या शुल्कासंदर्भात घेतला मोठा निर्णय

महत्वाच्या बातम्या-

जमीन विकत घेऊन फक्त गरजूंसाठी अन्नधान्य पिकवण्याचा विचार- हरभजन सिंह

राज्यात तीन पक्षांचं सरकार, कोण निर्णय घेतंय हे त्यांचं त्यांनाच कळेना- रावसाहेब दानवे

मुंबईत एकाच दिवशी चार पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू!

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More