Top News खेळ

मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

मेलबर्न | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. मेलबर्न क्रिकेट स्टेडिअमवर होणारा हा सामना भारतीय संघ विराट कोहलीच्या अनुपस्थितीत खेळणार आहे. त्यानिमित्ताने मराठमोळ्या अजिंक्य रहाणेला विदेश दौऱ्यात कसोटी संघाचं नेतृत्त्व करण्याचा मान मिळाला आहे.

अजिंक्यने याआधीही धर्मशाला स्टेडिअमवर भारतीय संघाचं कर्णधारपद भूषवलं आहे, मात्र यानिमित्ताने तो परदेशी खेळपट्टीवर पहिल्यांदाच कर्णधार म्हणून भूमिका बजावणार आहे.

बाहेरच्या देशांमध्ये भारतीय संघाचं कर्णधारपद भूषवण्याचा मान याआधी विजय हजारे, चंदू बोर्डे, अजित वाडेकर, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर या मराठमोळ्या खेळाडूंना मिळाला होता.

दरम्यान, मेलबर्न कसोटीमध्ये दोन भारतीय खेळाडू आपल्या कसोटी कारकीर्दीचा श्रीगणेशा करणार आहेत. सलामीचा फलंदाज शुभमन गिल आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हे आपलं नशिब आजमावणार आहेत.

थोडक्यात बातम्या-

ठाकरे सरकारकडून प्रामाणिक शेतकर्‍यांना ठेंगा दाखवण्याचं काम- देवेंद्र फडणवीस

‘राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला’; देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

नरेंद्र मोदी हेच शेतकऱ्यांचे खरे हितचिंतक आहेत- अमित शहा

“रावसाहेब दानवेंचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही”

जळगावात भाजपला धक्का; ‘या’ नेत्याने दिली भाजपला सोडचिठ्ठी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या