बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सत्ता गेल्यानं अनेकांना सहन होत नाही अन् सांगताही येत नाही”

मुंबई | सत्ता गेल्यानं अनेकांना सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशी अवस्था होऊन जाते, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांवर निशाणा साधला आहे. तीन महिन्यात सरकार कोसळेल असं सूचक विधान करणारा शेर मुनगंटीवारांनी नुकताच विधानसभेत सादर केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र पवारांनी मात्र मुनगंटीवारांच्या या विधानाचा चांगलाच खरपूस शब्दात समाचार घेतला आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना पवार म्हणाले की,बोलण्याची संधी मिळाली की मुनगंटीवार नेहमी सरकार पाडणार किंवा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणार अशी वक्तव्य करत असतात. सत्ता गेल्यामुळेच त्यांना वैफल्य आलं आहे. तसेच परळीत धनंजय मुंडे निवडून आले पण त्यांच्या पक्षाच्या पंकजा मुंडे यांना कोणी पाडले याची चर्चा पूर्ण राज्यभर आहे. भाजपमधील अनेकांना आमदारकीचं तिकीट मिळालं नाही तर काही जण नेमके पराभूत झाले, असं टोला लगावायलाही पवार यावेळेस विसरले नाहीत.

चंद्रकांत पाटील शांत स्वभावाचे असून ते योग्य वेळ आल्यावरच बोलतात असं म्हणत त्यांनी विधानसभेत हशा पिकवून दिला. तर एकनाथ खडसेंची भाजपने काय अवस्था केली, असा प्रश्न विचारत त्यांनी विरोधी पक्षाला डिवचलं आहे.

दरम्यान कोरोनाचं संकट असतानाही शेती, पायाभूत सुविधा, आरोग्य अन् महिला सक्षमीकरण यावर राज्य सरकारनं भर दिला आहे. तसेच शेतकऱ्यांना दिवसा विज उपलब्ध होण्यााठी 5 लाख विजपंप उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळेस केली आहे.

थोडक्यात बातम्या-

राखी सावंतचा नागीन अंदाज पाहिलात; पाहा व्हिडीओ

‘या’ कारणाने पतीकडून पत्नीचा निर्घृण खून; सहा महिन्यांपूर्वी झाला होता प्रेमविवाह

YouTube द्वारे पैसे कमवणाऱ्यांना गुगलचा मोठा झटका; केली ‘ही’ मोठी घोषणा

‘शेतकऱ्याची लाखमोलाची जमीन…’; नाना पटोलेंचा रामदेवबाबा अन् अंबानींना संतप्त सवाल

“सचिन वाझे ठाकरे सरकारचा जावई आहे का?”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More