बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अजितदादांचा दिलदारपणा! एका मिनिटात केली अमित शहांच्या मुक्कामाची सोय

पुणे | केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit shah) हे दोन दिवसांसाठी पुण्याच्या दौऱ्यावर आहे. पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनानं ते या दौऱ्याची सुरुवात करणार आहेत. गृहमंत्री म्हणून ते पहिल्यांदाच पुण्यात मुक्काम करणार आहेत. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात अमित शहांच्या या दौऱ्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा (amit shah) पुण्यात मुक्कामी आहेत मात्र त्यांच्या राहण्याची व्यवस्था न झाल्याचं समजताच राष्ट्रवादीचे (ncp) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी त्यांच्या राहण्याची व्यवस्था करुन दिली.

अजितदादांनी तातडीने सर्किट हाऊसमधील (pune circuit house) आपला व्हीव्हीआयपी (VVIP) सूट अमित शहा यांच्यासाठी उपलब्ध करून दिला. एकमेकांवर कितीही टीका टीपणी केली तरी राजकारणात कायम कुणीच कुणाचा शत्रू नसतो हे अजित पवार यांनी दाखवून दिलं.

दरम्यान, आपली व्यवस्था खासगी हाॅटेलमध्ये करण्याऐवजी शासकीय निवासस्थानातच करावी, अशा सूचना अमित शहा यांनी दिल्या होत्या. मात्र तिथे अमित शहांना राहण्याची सोय शक्य नसल्यानं शासकीय अधिकाऱ्यांनी थेट अजितदादांनाच फोन करून ही गोष्ट कानावर घातली आणि अजितदादांनी त्यांच्या मुक्कामाची सोय करुन दिली.

थोडक्यात बातम्या – 

सोनं-चांदी ‘इतक्या’ रुपयांनी महाग, वाचा आजचे ताजे दर

भारतीय संघाला मोठा धक्का; विराटनंतर आता आणखी एकाचा राजीनामा

“उद्धव ठाकरे हा व्यक्ती आयुष्यात कोणाचाच झाला नाही”

मोठी बातमी! मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी वाढल्या

‘हे खपवून घेणार नाही’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना पत्र

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More