बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का; ‘या’ कामात घोटाळा झाला का? होणार चौकशी

मुंबई | सध्या मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. सभागृहात विरोधक ठाकरे सरकार विरोधात आक्रमक झाले आहेत. मागील दोन दिवस सभागृह आरोप प्रत्यारोपानेे तापलं आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सरकारवर आग ओकताना दिसत होते. या अधिवेशना दरम्यान सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फडणवीसांना दणका दिला आहे.

मागील सरकारच्या काळात फडणवीस सरकारकडून 33 कोटी वृक्ष लागवड मोहिम हाती घेण्यात आली होती. हा प्रकल्प फडणवीस सरकारच्या काळातील एक महत्वकांक्षी प्रकल्प मानला जातो. यासाठी 2429.78 कोटी रूपये मंजूर झाले होते. यातील 25% झाडे जिवंत का राहिली नाही? याची चौकशी करण्याची मागणी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे. यानंतर या प्रकरणाची विधीमंडळ संयुक्त समितीकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी देखील नाना पटोलेंनी केली आहे.

या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तर दिल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात सांगितले आहे. मग मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावर मंत्र्यांचा भरोसा नाही का? आम्हाला चौकशीची अडचण नाहीये पण तुमचा तुमच्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही का? असा प्रश्न फडणवीसांनी सभागृहात विचारला. हा तर तुमचा ड्रीम प्रोजेक्ट होता. तर मग समिती नेमण्यात येणार असल्यानं तुम्हाला मिर्ची का लागली? असा जोरदार पलटवार नाना पटोलेंनी केला.

दरम्यान, फडणवीस सरकारच्या महत्वकांक्षी 33 कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेची विधीमंडळाच्या संयुक्त समितीतर्फे चौकशी करण्यात येणार आहे. पुढील सहा महिन्यात चौकशी अहवाल तयार करून सादर केला जाईल, अशी अजित पवारांनी घोषणा केली. त्यामुळे फडणवीस सरकारमधील घोटाळा बाहेर येईल का नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात कोरोनाचा उद्रेक, 24 तासात 10 जणांचा मृत्यू, 995 पॉझिटिव्ह!

“सुशांत गेला यात माझी काय चूक?”; भडकलेल्या अंकिताचा व्हिडीओ व्हायरल

तुमचं खातं SBI मध्ये असेल तर सावधान; अशाप्रकारे घातला जातोय गंडा!

भारताच्या ‘या’ स्टार गोलंदाजाचीही पडणार विकेट; कोण आहे लाईफ पार्टनर?

पोलिसांना विनाकारण वाहन अडवण्याचा नाही अधिकार, ‘या’ नंबरवर करा तक्रार!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More