Ajit Pawar | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार रोजी मंतरवाडी उरुळी देवाची येथील अॅचिव्हर्स इंटरनॅशनल स्कूल येथे भव्य स्वरूपाच्या “अजित मेगा मॅरेथॉन” चे पुणे जिल्हा युवती उपाध्यक्ष कु. प्रतिक्षा ज्योती महेंद्र बाजारे यांनी केलं होतं. सदर स्पर्धेला भर पावसात सुद्धा सुमारे 650 -700 खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
पहाटे 6 वाजता झुंबा या नृत्यप्रकाराने रील स्टार रोशनी काकडे हिने कार्यक्रमाची सुरुवात केली, कार्यक्रमास पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे सर यांनी हजेरी लावत प्रथम दोन गटांच्या रेसचे फ्लॅग ऑफ केले आणि अजित दादांच्या वाढदिवसानिमित्त असा भव्य स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल आयोजकांचं विशेष कौतुक केलं. त्याच बरोबर हवेलीचे तालुका अध्यक्ष प्रशांत भाडळे, शिरूर हवेली चे तालुका अध्यक्ष दिलीप नाना वाल्हेकर, युवक तालुकाअध्यक्ष प्रजित आबा हरपळे, वैद्यकीय सेवा प्रदेश कार्याध्यक्ष निनाद दादा टेमगीरे, स्वीकृत नगरसेवक भगवान भाडळे, नाना बाजारे
हडपसर विधानसभा अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे इत्यादी राजकीय मान्यवर उपस्थित होते.
या भव्य अजित मेगा मॅरेथॉन स्पर्धेस पुणे जिल्हा महिला उपाध्यक्ष सौ. जयश्री ताई पुणेकर हडपसर विधान सभा युवती अध्यक्ष सुजाता ताई कटके महिला हवेली तालुकाध्यक्ष प्राचिदीदी शितोळे देशमुख यांनी मोलाचं सहकार्य केलं.
आंतरराष्ट्रीय खेळाडू श्री. महेंद्र बाजारे सर यांच्या उत्तम नियोजनात ही स्पर्धा वैद्यकीय, प्रशासकीय नियमांचं पालन करत पार पडली. स्पर्धेचं सूत्रसंचलन श्री. दत्ता नाना म्हस्के यांनी केलं. स्पर्धेचे बक्षीस वितरण सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मनोज जरांगे पाटील 7 तारखेपासून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर; असा असणार दौरा
बजाजची ‘ही’ बाईक एकदा चार्ज केल्यावर धावणार तब्बल 136 किमी; जाणून घ्या किंमत
विधानसभेपूर्वी महायुतीत खटके; ‘त्या’ जागेवरून वादाची ठिणगी?
एचडीएफसी बँकेने ग्राहकांना दिला सर्वात मोठा धक्का!
काँग्रेसने ‘या’ 5 आमदारांचा विधानसभेचा पत्ता केला कट; पाहा कोण आहेत?