बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ही महाराष्ट्राची परंपरा नाही’; सभागृहातच अजित पवारांनी भास्कर जाधवांना सुनावलं

मुंबई | विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा (Winter session) आज पहिला दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पहायला मिळालं आहे. शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav)  आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात रंगलेल्या कलगीतुऱ्यामुळे सभागृहाचं वातावरण चांगलंच तापलं होतं. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावर भाष्य केलं आहे.

भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी विधानसभेत नक्कल केली. त्यावरून देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. भास्कर जाधव निलंबित करावं. त्यांनी सभागृहाची माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली होती. त्यावरून सभागृहात चांगलाच राडा झाला होता. अशातच अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना समजवण्याचा प्रयत्न केला आहे.

सभागृहातील तणाव पाहता अजित पवार बोलण्यासाठी उभा राहिले आणि त्यांनी भाजप आमदारांना जागेवर बसण्याचं आवाहन केलं. त्याचबरोबर भास्कर जाधव यांनी केलेलं वक्तव्य बरोबर नाही. एखाद्या वरिष्ठ नेत्याबद्दल असं बोलणं ही महाराष्ट्राची परंपरा नाही, ती आपली संस्कृती नाही, असं अजित पवार सभागृहात म्हटले आहेत.

दरम्यान, गदारोळानंतर सभागृहाचे कामकाज 15 मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं होतं. त्यानंतर भास्कर जाधव यांनी बिनशर्त माफी देखील मागितली. त्यानंतर विधानसभेचं कामकाज पुन्हा सुरू झालं.

थोडक्यात बातम्या-

मोदींची नक्कल, भाजपचा राडा अन् भास्कर जाधवांनी मागितली बिनशर्त माफी

“भाजप अमृता फडणवीसांना विरोधी पक्षनेत्या करणार का?”

“रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चार्ज द्यायला काही हरकत नाही”

“उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यातील नातं भाजप नेत्यांना कळणार नाही”

हिवाळी अधिवेशन: …म्हणून पहिल्याच दिवशी हिवाळी अधिवेशन स्थगित

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More