Top News

हे माज आलेलं सरकार… यांना सत्तेचा उन्माद चढलाय; अजित पवार संतापले

मुंबई | गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाल्यानं विरोधकांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार विधानसभेत आझ चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

हे सरकार बेजबाबदार सरकार, माज आलेलं सरकार आहे, लोकसभेला त्यांना मोदींच्या नेतृत्त्वात यश मिळालं याचा उत्माद चढलेला आहे, अशी टीका अजित पवार यांनी सरकारवर केला.

माणसं इथे किड्या-मुंग्यांसारखी मारत आहेत हे राज्य सरकारला दिसत नाही, अशी जहरी टीका अजित पवार यांनी केली आहे.

दरम्यान, विधानसभेत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील मुंबईच्या पावसावरून चांगलेच संतापले होते.

महत्वाच्या बातम्या-

-पावसाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री थेट पालिकेच्या आपतकालीन कक्षात

-शिवसेनेने ‘करुन’ नाही तर ‘भरुन’ दाखवलं- धनंजय मुंडे

-आदित्य ठाकरे म्हणतात ही नैसर्गिक स्थिती; मुंबई महापालिकेला दोष देऊ नका

-मालाड दुर्घटना पालिकेचं अपयश नाही तर तो एक अपघात- संजय राऊत

-गरज असेल तरच घराबाहेर पडा; प्रशासनाचं पुणेकरांना आवाहन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या