रत्नागिरी | रत्नागिरी जिल्हा शासकीय योजनेच्या जिल्ह्यातील सर्व सहकारी दुध संस्थांची मागील 3-4 महिन्यांची थकीत असलेल्या रक्कमेसंदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस अजित यशवंतराव यांनी 2.50 कोटी रक्कमेची आग्रही मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती.
शासकीय दूध योजना ही जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थानचे दूध संकलित करण्याचं काम करत आहे. या योजनेकडून सहकारी संस्थानला गेले तीन-चार महिने उलटले तरी बिलाची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे या सहकारी संस्था चालवणं दिवसेंदिवस कठिण होत आहे, अशी समस्या अजित यशवंतराव यांनी पत्रातून मांडली होती.
यावर अजित पवार यांनी सकारात्मक निर्णय घेत रत्नागिरी जिल्हा शासकीय दुध संस्थेला 1.09 कोटी रक्कम तातडीने वर्ग केली. तसेच उर्वरित रक्कम मार्च 2020 पर्यंत जमा होणार असल्याचं संबंधित विभागाकडून कळविण्यात आलं आहे.
दरम्यान, रक्कम मंजुर झाल्याने जिल्ह्यातील सर्व दुग्ध शेतकऱ्यांनी तसेच सहकारी दुध संस्थांनी अजित यशवंतराव आणि उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.
थोडक्यात बातम्या-
…तर आज काश्मिरी तरुण IAS आणि IPS अधिकारी असते- अमित शह
“शिवजयंती धूमधडाक्यातच झाली पाहिजे, कुठलं सरकार आम्हाला थांबवू शकत नाही”
“पूजा चव्हाणला न्याय देण्याची तुमच्यात धमक नाही”
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
आरजे राघव… पोराच्या एका व्हिडीओनं आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलंय!