महाराष्ट्र मुंबई

शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांसह 69 जणांना ‘क्लीन चिट’

मुंबई | महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या 25 हजार कोटी रूपयांच्या कथित घोटाळ्या प्रकरणी अजित पवार यांना दिलासा मिळाला आहे. अजित पवार यांच्यासह 69 जणांना क्लीन चीट देण्यात आली आहे.

राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जवाटप प्रकरणांत अनियमितता आढळल्यानं तब्बल 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप ‘नाबार्ड’च्या अहवालात आहे. ‘नाबार्ड’ने दिलेल्या अहवालाच्या आधारे समाजिक कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.

याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 69 आरोपी बनविण्यात आले होते. या सर्वांना क्लीन चिट देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून गुप्तेश्वर पांडेंना तिकीट दिलं नसावं- अनिल देशमुख

‘कोणीतरी सरकारचा पुरस्कार परत करणार होतं’; स्वरा भास्करचा कंगणाला चिमटा

मराठा समाजाच्या 10 तारखेच्या महाराष्ट्र बंदला आमचा पाठिंबा- प्रकाश आंबेडकर

‘आत्महत्येचा विचार अनेकदा माझ्या मनात आला, पण…’; रिया चक्रवर्तीच्या आईचं वक्तव्य

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या