बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अनिल देशमुखांच्या मुलासह अजित पवार पोहोचले गडकरींच्या भेटीला, राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई | राज्यात सध्या अनेक मुद्दे गाजत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची भेट घेतली. अजित पवार हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या मुलासह गडकरींच्या भेटीला गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

अजित पवार व सलील देशमुख (Salil Deshmukh) यांच्यासह राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) देखील नितीन गडकरींच्या भेटीला उपस्थित होते. या बैठकीनंतर अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. विकास कामात कुठे राजकारण येऊ नये म्हणून आम्ही त्यांच्या घरी जाऊन चर्चा केली असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.

राज्यातील रस्त्यांसाठी केंद्रीय फंडातून निधी मिळावा, अशी मागणी या बैठकीत केली असल्याची माहितीही अजित पवारांनी दिली. केंद्राने राज्याला निधी द्यावा लागतो आणि राज्य त्याचं वाटप करतं. त्यामुळे यात समन्वय असावा आणि राजकारण येऊ नये यासाठी ही भेट घेतल्याचं अजित पवार म्हणाले.

दरम्यान, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, या भेटीत विकास कामांवर चर्चा झाली असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं.

थोडक्यात बातम्या-

चुकीला माफी नाही! वाहतुकीचे नियम मोडल्यानं अजित पवारांनी भरला ‘इतक्या’ हजारांचा दंड

2 मेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज

“जोपर्यंत भाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत राज ठाकरे महाराष्ट्राचं कौतूक करणार नाहीत”

“काय शोकांतिका आहे, नवाब मलिक जेलमध्ये बसून मंत्रिमंडळाचा निर्णय घेतात”

सलमान खानच्या ‘या’ चित्रपटातून शहनाज गिल लवकरच करणार बाॅलिवूड पदार्पण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More