बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अजित पवार आणि अनिल परबांचे मनसुख हिरेन आणि स्फोटक प्रकरणातील वाझेशी संबंध”

मुंबई | देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आणि त्यानंतर मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याशी उपमुख्यमंंत्री अजित पवार आणि शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांचे संबंंध असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. यासंदर्भात पाटलांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलं आहे.

महाराष्ट्र राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पुर्णपणे कोलमडली असून बेकायदेशीरपणे पैसे वसुल करणे हा राज्य सरकारचा कारभार आहे. अजित पवारांनी दर्शन घोडावत यांच्याकडून कोट्यवधी रूपयांची खंडणी उकळली असल्याचा आरोप चंद्रकांत पाटलांनी पत्रात केला आहे.

निलंबित अधिकारी सचिन वाझे हा  अनिल परब यांच्यासाठी वसुली करत होता. महापालिकेतील कंत्राटदारांना अनिल परब यांनी सचिन वाझेंकडुन धमकी दिली. त्यासोबतच पन्नास कंत्राटदाराकडून प्रत्येकी दोन कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिलं असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अजित पवार, अनिल परब आणि दर्शन घोडावत यांची सीबीआय चौकशी करण्यात यावी, ही तक्रार कुठल्याही राजकीय अजेंड्यासाठी नाही. महाराष्ट्रातील जनतेचा कायद्यावरील विश्वास उडत चालला आहे. याची गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

“राज्यपाल भगतसिंह कोश्यारी भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यासारखं वागत आहेत”‘

रणवीर सिंहचा नवीन लूक पाहून चाहते झाले सैराट, पाहा फोटो

आज सोनं तब्बल 460 रुपयांनी घसरलं, तर चांदी देखील उतरली; वाचा ताजे दर

कोरोनाकाळात ‘या’ शहरातील खासगी रुग्णालयाविरूध्द तब्बल 580 तक्रारी, 496 लागल्या निकाली

ज्येष्ठ अभिनेता पद्मश्री नसीरुद्दीन शहा यांच्या प्रकृतीबाबत महत्वाची अपडेट!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More