बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराजांच्या आजच्या भेटीची कल्पनाच नव्हती”- संभाजीराजे भोसले

पुणे | राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने चांगलाच जोर धरला आहे. खासदार संभाजीराजे भोसले यांनी नुकतंच मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आंदोलनाची हाक दिलेली असताना आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरात श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची भेट घेतली आहे. जवळपास एक तास ही बैठक चालू होती. मात्र, या बैठकीबद्दल आपल्याला काहीच माहित नसल्याचं छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

संभाजीराजेंनी आज पुण्यात उदयनराजेंची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद सांधला. यावेळी बोलताना संभाजीराजे म्हणाले की, अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराजांच्या भेटीविषयी मला काहीही कल्पना नव्हती. मला राजमहालातून कळवण्यात आले होते. या भेटीत काय झालं हे देखील मला माहीत नाही. पण काही सकारात्मक होत असेल तर स्वागतच आहे.

यावेळी संभाजीराजेंनी इतरही काही महत्वाच्या मुद्यांवर भाष्य केलं आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही पाच मागण्या केल्यात. त्या पूर्ण करणे राज्याच्या हातात आहेत. त्यातील पहिली मागणी सारथीची, दुसरी मागणी अण्णासाहेब पाटील महामंडळाची आहे. तिसरी मागणी ओबीसींना ज्या सवलती मिळतात त्या मराठा समाजाला द्या, चौथी मागणी पंजाबराव देशमुख योजनेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात एक वसतीगृह निर्माण करा, पाचवी महत्त्वाची मागणी जे 2 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी अडकले आहेत, त्यांना नोकरी द्या.

तसेच सुप्रीम कोर्टानेही आदेश दिला आहे की, या मागण्या मंजूर करा आम्ही तुमचं स्वागत करु. पण आता आम्ही खूप बोललोय, आता लोकप्रतिनिधींनी बोलण्याची वेळ आली आहे. अधिवेशनाची आमची मागणी आहे. या माध्यमातून काही प्रश्न सुटू शकतात, असंही संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

छत्रपती शाहू महाराज आणि अजित पवारांच्या लक्षवेधी भेटीनंतर शाहू महाराज म्हणाले…

उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्या भेटीत नेमकं काय झालं?, वाचा सविस्तर

“लोकशाहीतील राजे नीट वागत नसतील तर त्यांना आडवा आणि गाडा”

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी केंद्र सरकारकडून ‘ही’ मोठी तयारी सुरु!

‘भारतीय संघातील ‘हे’ 2 खेळाडू न्यूझीलंडवर पडतील भारी’- डेव्हिड वॉर्नर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More