मुख्यमंत्री आणि अजित पवारांचा चक्क एकत्र विमान प्रवास

औरंगाबाद | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काल चक्क एकाच विमानातून प्रवास केला. औरंगाबादच्या चिकलठाणातील एका विवाहसोहळ्याला दोघांनी हजेरी लावली. 

मुख्यमंत्र्यांनी आपला हा दौरा कमालीचा गुप्त ठेवला होता. चिकलठाणा विमानतळावर दोघे विमानातून उतरल्यानंतरही बाब समोर आली. 

आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे विमानतळ ते विवाहस्थळ आणि विवाहस्थळ ते विमानतळ हा प्रवास दोघांनी एकाच गाडीतून केला. मात्र सोबत न जाता एकमेंकांपासून विशिष्ट अंतर ठेऊन ते या गाडीत बसले. पुन्हा एकाच विमानातून मुंबईला रवाना झाले. 

दरम्यान, या प्रकारामुळे राज्याच्या राजकारणात चर्चेला नवा विषय मिळाला आहे.