अहमदनगर | अजित पवार यांच्या शाब्दिक फटक्यांमुळे एका शेतकऱ्याने आजपासून तंबाखू कायमची सोडली. श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ गावाजवळ हा प्रकार घडला.
कुंडलिकराव जगताप यांच्या निधनामुळे आमदार राहुल जगताप यांचे सांत्वन करण्यासाठी ते पिंपळगाव पिसाला आले होते. परत जाताना ते लोणी व्यंकनाथजवळ रेल्वे गेट उडण्याची वाट पाहात असताना त्यांनी तेथील एका शेतकऱ्याची विचारपूस केली.
दुसरा शेतकरी तंबाखू खात असल्याचं दिसल्यावर त्यांनी त्याला चांगलंच दरडावलं. तेव्हा “दादा आजपासून तंबाखू कायमची सोडली”, असं त्यानं जाहीर करुन टाकलं.
Comments are closed.