पुणे महाराष्ट्र

“आपके राज्य में बिना आपके परमिशन आ गये”

पुणे | पुणे जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत पार पडला. सकाळी 9 वाजून 5 मिनीटांनी राज्यपालांच्या हस्ते मोठ्या उत्साहात ध्वजारोहण झाले. मात्र कार्यक्रमस्थळी येतानी राज्यपालांची उपमुख्यंत्री अजित पवारांशी समोरासमोर भेट झाली. यादरम्यान राज्यपालांनी पवारांना विनोदी डायलाॅग सुनावल्याचं आता पहायला मिळत आहे.

“आपके राज्य में हम बिना आपके परमिशन आ गये” असा डायलाॅग खुद्द राज्यपालांनीच अजित पवारांशी भेट झाल्यावर मारला. यावर पवारांनी चक्क हात जोडून राज्यपालांना दंडवत घातल्यानं उपस्थितांच्या चेहऱ्यावरही स्मितहास्य उमटल्याचं पहायला मिळालं.

पुण्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा आज राज्यपालांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. पुण्यातील कोरोनाचा आकडा वाढत असल्यानं कार्यक्रमस्थळी सोशल डिस्टंसिंगचंही तंतोतंत पालन करण्यात आलं होतं.

शहरातील कौन्सिल हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार गिरीश बापट, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, संदीप बिष्णोई, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे या मान्यवरांची विशेष उपस्थिती पहायला मिळाली.

 

महत्वाच्या बातम्या-

“शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभं करणार” स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्याचा निर्धार!

जे दिसतात ते सोबत नसतात, जे सोबत असतात ते दिसत नाहीत- उद्धव ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

स्वातंत्र्यदिनाला गालबोट; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतलं अन्…

‘मेक इन इंडिया’ सोबत ‘मेक फॉर वर्ल्ड’ हा मंत्रही अंगीकारला पाहिजे- नरेंद्र मोदी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या