शरद पवार गटातील ‘हा’ बडा आमदार अजितदादांच्या भेटीला, चर्चेला उधाण

Ajit Pawar and Rohit Patil meet

Ajit Pawar | विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीमध्ये अनेक बड्या नेत्यांची इनकमिंग दिसून आली. सर्वाधिक नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षात परतले. तर, निकालानंतर आता चित्र बदलले आहे. या निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला. यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने दमदार कामगिरी करून दाखवली. तेच शरद पवार यांच्या पक्षाला फक्त 10 जागांवर समाधान मानावे लागले. अशात शरद पवार गटातील एका बड्या आमदाराने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली आहे.

या भेटीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलंय. काही दिवसांपूर्वीच स्वतः अजित पवार यांनी शरद पवार यांच्या 85 व्या वाढदिवशी दिल्लीत सहकुटुंब त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यानंतर राष्ट्रवादीमध्ये पुन्हा मनो मिलाप होणार काय?, काका-पुतणे पुन्हा एक होणार काय? याबाबत चर्चा रंगल्या होत्या.

रोहित पाटील-अजित पवार भेट

अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर.आर.पाटील यांचे सुपूत्र आमदार रोहित पाटील यांनी नागपूरमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. तर, दोन दिवसांपूर्वीच साताऱ्यातील शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांनीही अजितदादांची भेट घेतली होती. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी शशिकांत शिंदेंसारखे नेते दादांना असेच भेटणार नाहीत असं म्हटलं होतं.

यानंतर रोहित पाटील यांनी देखील अजित पवारांची भेट घेतल्याने अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. रोहित पाटील यांच्यानंतर सलील देशमुख देखील अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले. सलील देशमुख अनिल देशमुख यांचे पुत्र आहेत. विधानसभा निवडणुकीत काटोलमध्ये सलील देशमुख यांचा पराभव झाला.

तर, रोहित पाटील हे तासगाव-कवठेमहाकाळमधून निवडून आले आहेत. रोहित पाटील यांनी अजितदादांची (Ajit Pawar) भेट का घेतली?, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

News Title :  Ajit Pawar and Rohit Patil meet

महत्वाच्या बातम्या –

मारहाण व मराठी भाषेला हिणवणाऱ्या शुक्लाला अटक करा अन्यथा…; मनसे आक्रमक

“मराठी माणसं भिकारी, तुमचं मराठीपण काढतोच”; म्हणत हिंदी भाषिक अधिकाऱ्याकडून मारहाण, नेमकं काय घडलं?

आज ‘या’ राशींवर असणार स्वामींची विशेष कृपा!

सगळ्यांसमोर अभिषेकने ऐश्वर्यासोबत केलं असं काही…; सोशल मीडियावर व्हिडीओ तूफान व्हायरल!

‘इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्रींवर ‘त्या’ गोष्टींचा दबाव’; सोनाक्षी सिन्हाचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .