मुंबई | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आज विधानसभेत चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले. मंत्र्यांना मागे बसवलंय… त्यांना पुढं बसवा… ही काय पद्धत झाली काय?? अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
सुनिल प्रभू यांनी मंत्री अशोक उईके यांच्या जागेवरून प्रश्न विचारल्याने प्रश्न विचारताना स्वत:च्या जागेवरून प्रश्न विचारा, असं अजित पवारांनी सुनावलं.
दुसरीकडे अजित पवारांच्या टीकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना अतिशय सायलेंट आणि मिश्किल उत्तर दिलं. अजितदादांना सुनिल प्रभू आणि आशिष शेलार यांना एकमेकांशेजारी बसल्याचं बघायचं नाही, असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला.
दरम्यान, महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरूवात झाली आहे. अधिवेशनादरम्यान विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याचा पुरेपुर प्रयत्न करत आहे.
महत्वाच्या बातम्या
-मुनगंटीवार आणि केसरकरांच्या पेटाऱ्यात दडलंय काय?? आज राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर होणार
-मी पाक क्रिकेट संघाची आई नाही; सानिया आणि वीणा मलिकची ट्वीटरवर जुंपली
-पुणेकरांसाठी खुशखबर; हेल्मेटसक्तीची कारवाई थांबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
-जुन्या विनोदाने शिक्षणाची घाण केली; बच्चू कडूंचा तावडेंवर हल्लाबोल
-जे शिक्षण आमदाराचा मुलगा घेतो तेच शिक्षण गरिबाच्या मुलाला मिळालं पाहिजे- बच्चू कडू
Comments are closed.