बारामतीत उमेदवार बदलणार?; अजित पवारांचं मोठं वक्तव्य

Ajit pawar | आगामी लोकसभा निवडणूक आता जवळ आली आहे. पहिल्या टप्प्यातील उमेदवारांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी पत्रकार परिषद घेत रायगड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवर भाष्य केलं आहे. रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते सुनील तटकरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

दरम्यान काही वेळापूर्वीच माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे. पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना अजित पवार यांनी आढळरावांबद्दल एक गोष्ट सांगितली होती. आढळराव हे शिवसेनेआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते. तर 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा आढळराव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले, असं अजित पवार (Ajit pawar) म्हणाले.

आढळराव पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश

आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. यानंतर अजित पवार (Ajit pawar) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक मुद्यांवर भाष्य केलं आहे. सध्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार लढणार असल्याच्या चर्चा आहेत.

सुप्रिया सुळे यांच्या बाजूनं अख्ख पवार कुटुंब एकवटलं आहे. पवार कुटुंब अजित पवार यांच्याविरोधात बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जात प्रचार देखील करत आहे. तर अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली असून बारामतीतून प्रचार रथ फिरवण्यात आले. सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवर अद्यापही अधिकृत माहिती समोर आली नाही. यावेळी पत्रकारांनी अजित पवार यांना सुप्रिया सुळेंविरोधात कोण लढणार? असा प्रश्न केला त्यावर अजित पवार (Ajit pawar) यांनी उत्तर दिलं.

सुप्रिया सुळेंविरोधात कोण लढणार?

सुप्रिया सुळेंविरोधात कोण लढणार? असा सवाल पत्रकाराने अजित पवार यांना केला तेव्हा अजित पवार यांनी त्यांच्या स्टाईलनं उत्तर दिलं. अजित पवार म्हणाले, 28 तारखेला याबाबत सांगणार असल्याचं अजित पवार म्हणाले. “तेच तुमच्या मनात जो उमेदवार आहे. तोच उमेदवार 99 टक्के असणार आहे,” असं उत्तर अजित पवार यांनी दिलं आहे. मात्र बारामती मतदारसंघामध्ये शिवसेना नेते विजय शिवतारे निवडणूक लढणार असल्याचा दावा शिवतारे यांनी केला आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे.

बारामती मतदारसंघात तिहेरी लढत

एका बाजूला नणंद आणि भाउजय अशी लढत पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे विजय शिवतारे यांनी बारामती मतदारसंघातून लोकसभेसाठी लढणार असल्याचा दावा केला आहे. शिवतारे अनेक दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जात लोकांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहे. यामुळे सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार विरूद्ध विजय शिवतारे अशी तिहेरी लढत होणार आहे.

News title – Ajit Pawar Announce baramati Lok sabha candidate against Supriya Sule

महत्त्वाच्या बातम्या

“सच्च्या मराठ्यांनी जरांगेंना शिव्या…”; बारस्करांच्या ‘त्या’ वक्तव्याने खळबळ

अजित पवारांनी धनंजय मुंडेंना दिली सर्वांत मोठी जबाबदारी!

मोठी बातमी! शिवाजी आढळराव पाटील यांचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश

अजित पवार यांच्याकडून पहिल्या उमेदवाराची घोषणा!

आज CSK विरुद्ध GT सामना रंगणार; अशी असेल संभाव्य प्लेयिंग 11