‘शरद पवारांचं नाव घेतलं तर…’; अजित पवारांनी राज ठाकरेंना सुनावलं

मुंबई | राज ठाकरे नुकतेच कोकण दौऱ्यावर गेले असताना त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भात भूमिका मांडली. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासूनच राज्यात जातीपातींचं राजकारण सुरू झाल्याचं राज ठाकरे(Raj Thackeray) यावेळी म्हणाले. 

राज ठाकरेंनी केल्यानंतर त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही प्रत्युत्तर दिलं जात आहे. आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज ठाकरेंच्या आरोपांवरून टोला लगावला आहे. 

55 वर्ष शरद पवार राजकारण करत आहेत. त्यांनी नेहमी शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार डोळ्यांसमोर ठेवला. सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याचं काम केलं. वास्तविक राज ठाकरेंनी हा आरोप करणं म्हणजे हास्यास्पद बाब आहे. त्यात नखभरही तथ्य नाही, असं अजित पवार म्हणाले.

राज ठाकरे शरद पवारांची मुलाखत घेत होते, तेव्हा त्यांच्याबद्दल काय बोलत होते? इतकं दुटप्पीही माणसाने वागू नये, असंही अजित पवार म्हणालेत.

राज ठाकरेंचा आरोप धादांत बिनबुडाचा आहे. शरद पवारांचं नाव घेतलं तर ती बातमी होते. राज ठाकरेंसारख्या व्यक्तीने अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे योग्य वाटत नाही, असंही ते म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-