नागपूर | शिळ्या कढीला उत आणण्यात काही अर्थ नाही, असं म्हणत अमित शहांनी शिवसेनेवर केलेल्या आरोपांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
नारायण राणे यांनी उभारलेल्या लाईफटाईम हॉस्पिटलचं लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना अमित शहांनी शिवसेनेवर सडकून केली. यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिळ्या कढीला उत आणण्यात काही अर्थ नाही. उद्धव ठाकरे यांनी वारंवार सांगितलं आहे त्यांच्यात आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात बंद खोलीत चर्चा झाली होती, असं अजित पवारांनी सांगितलं.
राज्यात महाविकासआघाडी सरकार आलं तेव्हापासून सांगितलं जातंय की हे सरकार जाईल. मात्र आमच्या तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचा या सरकारला आशीर्वाद आहे. जोपर्यंत हा आशीर्वाद आहे तोपर्यंत महाविकासआघाडी सरकारला काहीच होऊ शकत नाही, असंही अजित पवार म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
…म्हणून उद्घाटनाला अमित शहांना बोलावलं- नारायण राणे
मी बंद खोलीत कधीच काही करत नाही, उद्धव ठाकरे खोटं बोलले- अमित शहा
“महाराष्ट्रात कोणी चाणक्य बिणक्य चालणार नाही”
नारायण राणे विनोद करतात, हे मला माहीत नव्हतं- शरद पवार
“राणेंसारख्या नेत्यांना कसं सांभाळायचं आम्हाला माहीती आहे, त्यांच्यावर अन्याय होणार नाही”