बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी सार्वजनिक कार्यक्रम नको, मात्र ही एक गोष्ट करा”

मुंबई | राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी सार्वजनिक कार्यक्रमांचं आयोजन करु नका. त्या ऐवजी सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून रक्तदान शिबिरांचं राज्यभर आयोजन करण्यात यावं, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

राष्ट्रवादी पक्ष येत्या 10 जून रोजी 21 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. कोरोना संकटामुळे हा वर्धापन दिन सार्वजनिकरित्या व मोठ्या प्रमाणावर साजरा करता येणार नसला तरी वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपली सामाजिक बांधिलकी पार पाडण्याची गरज आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत.

कोरोना रुग्णांना रक्ताची गरज पडत नाही, पण राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या थॅलेसेमिया आणि अन्य रुग्णांना वेळोवेळी रक्ताची गरज भासते. ही गरज पूर्ण करण्यासाठी पक्षाच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नागरिकांनी पुढे यावं, स्वत: रक्तदान करावं, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.

राज्यावरील कोरोनाचे संकट आणि गेल्या अडीच महिन्यांच्या लॉकडाऊनच्या काळात पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी विविध समाजोपयोगी उपक्रमांद्वारे केलेल्या जनसेवेबद्दल अजित पवारांनी कार्यकर्त्यांचं अभिनंदन करुन आभार मानले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

अत्यावश्यक सेवेसाठी केंद्राने मुंबईत लोकल सुरू करावी; आव्हाडांची मागणी

5 अनाथ मुलांना मराठमोळे जिल्हाधिकारी रमेश घोलप यांनी दिला मदतीचा हात

महत्वाच्या बातम्या-

“तुम्ही कोरोनाचा आलेख खाली आणायचा सोडून अर्थव्यवस्थेचाच आणला”

मंत्री अशोक चव्हाण यांची कोरोनावर मात; रूग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

केरळात गर्भार हत्तीणीचा मृत्यू; भाजप नेत्या मेनका गांधी राहुल गांधींवर संतापल्या

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More