बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार

मुंबई | एकनाथ शिंदेंच्या बंडाळीनंतर राज्यात मोठं राजकीय वादळ आलं. तब्बल 10 दिवसांच्या सत्तासंघर्षानंतर महाराष्ट्रात शिंदे सरकार स्थापन झालं आहे. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण हे स्पष्ट झाल्यानंतर आता विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याची धूरा कोणाकडे जाणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सत्तांतरानंतर आता देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या भूमिका अदला-बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस आता उपमुख्यमंत्री तर अजित पवार विधानसभेचे नवे विरोधी पक्षनेते आहेत.

दरम्यान, विरोधी पक्षनेतेपदी अजित पवारांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन प्रस्ताव सादर केला. यावेळी अजित पवारांचं व्यक्तिमत्त्व हे तरूणांना देखील हेवा वाटावं असं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. तर अजित पवार सभागृहाचा उत्तम अनुभव असणारे विरोधी पक्षनेते असल्याचं देखील एकनाथ शिंदे म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“ताकद कमी झाली तरी महाराष्ट्रात आणि जनतेच्या मनात आम्हीच”

“शरद पवार बोलतात त्याच्या नेहमी उलट होतं, त्यामुळे…”

‘…ती ईडी म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र’, फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

‘दाल मे कुछ काला है, 106 आमदार असलेल्या पक्षाचा मुख्यंमंत्री होत नाही म्हणजे काय?’

‘…तर शिंदे साहेब महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल’, शिवसेना आमदाराचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More