नागपूर महाराष्ट्र

“ओबीसींच्या महाज्योतीला पैसे देताना हात थरथरतात का?”

File Photo

नागपूर | महाज्योती संस्थेला निधी देताना तुमचे हात थरथरतात का?, असा सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना केला आहे.

महाज्योती संस्थेला 500 कोटी रुपयांचा निधी मिळावा, या मागणीच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी नागपुरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना पडळकरांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केलीये.

अजित पवार एका दिवसात सार्थी संस्थेला निधी देतात. मग महाज्योती संस्थेला निधी देताना तुमचे हात थरथरतात का?. या सरकारने जाणीवपूर्वक महाज्योतीला निधी दिला नाही, असं पडळकरांनी म्हटलंय.

महाज्योती संस्थेला फडणवीस सरकारने 320 कोटी रुपये दिले होते. पण सध्याच्या राज्य सरकारकडून महाज्योती संस्थेकडे दुर्लक्ष केलं जातंय.  ओबीसी आणि भटक्यांवर हे सरकार अन्याय करत आहे, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.

थोडक्यात बातम्या-

गेल्या सरकारच्या काळात मला प्रचंड त्रास झाला- तात्याराव लहाने

…अन् अजितदादांनी जुन्या मित्राला आस्थेनं विचारलं, “तुमची तब्येत बरी आहे ना?”

…तेव्हा तुमच्या मंत्र्यांना घरी पाठवलं हे विसरलात काय?- अण्णा हजारे

“कोरोना काळात तुकाराम मुंढेंनी चांगलं काम केलं”

किरीट सोमय्यांच्या मुलावर खंडणी उकळल्याचा आरोप!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या