बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राजनाथ सिंह यांचा अजित पवारांना फोन, म्हणाले…

मुंबई | राज्यात गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाने जोरदार तडाखा लावलेला आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोकणातील नागरिक संकटात आहेत. तर दुसरीकडे मध्य महाराष्ट्रात महापूराची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राज्य सरकार पूरस्थितखील मागवण्यात आली आहे. त्यातच आता संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्राला मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.

रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, महापूर, दरड कोसळून निर्माण झालेल्या आपत्कालिन परिस्थितीबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी फोनवरुन चर्चा केली आणि त्यांना पूरस्थितीची माहिती दिल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं आहे. त्यावर या भागात सैन्यदलांची मदत तत्काळ उपलब्ध करण्यात आली असून सैन्यदलांची अधिकची मदतही उपलब्ध करण्याचं आश्वासन संरक्षणमंत्र्यांनी दिलं आहे.

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे बचाव व मदकार्यावर लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्यानं अतिवृष्टीग्रस्त भागातील मदत व बचावकार्याचा आढावा घेत असून आवश्यक निरर्देश तातडीनं दिले जात असल्याचं देखील अजित पवारांनी सांगितलं आहे. तर पूरात अडकलेल्या नागरिकांना आवश्यक मदत तातडीनं उपलब्ध करण्याचे तसंच स्थिती पूर्ववत होईपर्यंत जिल्हा न सोडण्याच्या सूचना मंत्री लोकप्रतिनिधींना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती देखील अजित पवारांनी दिली आहे.

दरम्यान, अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांनीही सुरक्षित स्थळी आसरा घेऊन परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत बाहेर पडू नये. आपत्तीग्रस्त नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी पोलीस किंवा स्थानिक प्रशासनाशी, लोकप्रतिनिधींशी संपर्क साधण्याचं आवाहन देखील अजित पवारांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

केंद्र सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय; जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना

चिंताजनक! राज्यातील नव्या बाधितांची आकडेवारी नियंत्रित मात्र मृतांची आकडेवारी….

कुंद्राच्या काळ्या साम्राज्याचा राज उघड, व्हिडीओंसाठी घेतलेले पैसे ऐकाल तर थक्क व्हाल!

दिलासादायक! मुंबई कोरोनामुक्तीच्या वाटेवर, नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More