“आतापर्यंत मी तुमचं ऐकत आलो आता माझं तुम्हाला ऐकावं लागेल”

Ajit Pawar । आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर होतील. राज्यातील बारामती लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचं नाहीतर देशाचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar) काका-पुतण्यामध्येही उभी फूट पडली आहे. यामुळे बारामतीमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे आमने सामने दिसणार असल्याच्या चर्चा आहेत. हे आता जवळपास निश्चित झालं आहे.

अजित पवार यांची पुन्हा भावनिक साद

अजित पवार (Ajit Pawar) हे आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. आपली पत्नी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी ते बैठक, सभा घेताना दिसत आहेत. त्यांनी पुन्हा एकदा बारामतीकरांना भावनिक साद घातली आहे. आतापर्यंत मी तुमचं ऐकत आलो आता माझं तुम्हाला ऐकावं लागेल, असं म्हणत अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीकरांना भावनिक साद घातली आहे.

यावेळी बोलत असताना त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. आज किंवा उद्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते. त्यामध्ये आपल्याला नियम पाळावे लागतात. त्यानंतर आधी लोकसभा निवडणूक आणि नंतर विधानसभा निवडणूक असणार आहेत, असं अजित पवार म्हणाले आहेत. त्यानंतर त्यांनी बारामतीतील विकास कामावर भाष्य केलं आहे.

बारामतीच्या विकासावर भाष्य

बारामतीमध्ये विकास होत गेला. थोरामोठ्यांमुळे कामाला हुरूप आलं. बारामतीतील एमआयडीसी विभागामध्ये काही कंपन्यांना जागा कमी पडली. त्यावेळी मी व्यवसायिक आणि नोकरदार वर्गामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे. कंपनीचा फायदा होत असेल तर कंपनीने देखील साथ दिली पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.

माझा स्वभाव कडक आहे. पण मी कोणावर दबाव आणला नाही. माझ्यासोबत खासदार असला की केंद्र सरकारची कामं पूर्ण होतील असं अजित पवार म्हणाले. आजपर्यंत जशी साथ दिली तशी लोकसभेला देखील द्या, असं अजित पवार यांनी बारामतीकरांना आवाहन केलं आहे.

माझं चिन्ह घड्याळ आहे. जसजशी निवडणूक जवळ येईल तसा तुमच्यावर दबाव टाकला जाईल. मी आतापर्यंत कोणावरही दबाव टाकला नाही. महायुती लवकरच उमेदवारी जाहीर करणार आहे. त्यावेळी मला तुम्ही साथ द्याल, असं अजित पवार म्हणाले आहेत.

News Title – Ajit pawar At baramati About baramati Assembly Election

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवारांना पहिला मोठा झटका; निलेश लंकेंनी अजित पवारांचं ऐकलंच नाही

“त्याची मर्जी, सानिया मिर्झाला ठेवून आणखी चार..”, अभिनेत्रीचं शोएबबद्दल धक्कादायक वक्तव्य

‘…आता त्याचा निर्णय’; निलेश लंकेंबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य

आता वजन कमी करणं झालं सोपं, फक्त आठवड्यातून एकदाच…

‘तू बधिर झालेला मंत्री…’; मनोज जरांगे पाटील फडणवीसांवर पुन्हा भडकले