बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सत्ता असो वा नसो बारामतीचा विकास थांबणार नाही”

पुणे | महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल बारामती (Baramati) तालुक्यात एका वृक्षरोपणाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी बारामतीतील विकास कामांची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी कार्यकर्ते आणि जनतेशी संवाद साधला. अजित पवार यांनी यावेळी भाषणात म्हंटले की, सत्ता असो वा नसो, तालुक्याच्या विकासकामांकडे माझं बारकाईने लक्ष असतं.

मी कितीही कामात असलो तरी बारामतीला दर आठवड्याला येण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी होती. मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागल्याने आता विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी आली आहे. सत्ता असो वा नसो, तालुक्याच्या विकासकामासाठी आणि बारामतीत सोयीसुविधा असाव्यात यासाठी माझे सतत प्रयत्न असतात, असे यावेळी पवार म्हणाले.

यावेळी त्यांनी वृक्षरोपणाच्या कार्यक्रमाचे कौतुक केले. तसेच एक पथनाट्य यावेळी सादर करण्यात आले. त्याचे दिग्दर्शक ओंकार पवार यांचे देखील त्यांनी कौतुक केले. बारामतीत काम करायचे म्हणजे कोणीतरी पवार लागतोच, असा विनोद देखील त्यांनी यावेळी केला. यावेळी मुलींनी पर्यावरणावर लावणी सादर केली. त्यावर बोलताना पवारांनी, जरा नऊवारी नेसून लावणी सादर केली असती तर उपस्थितांना आनंद झाला, असता असा मिश्किल सल्लाही दिला.

वृक्षारोपण कार्यक्रमानंतर पवारांनी कार्यकर्त्यांना सूचना देखील दिल्या. झाडे लावली म्हणजे वृक्षारोपण झाले नाही तर, त्याकडे रोज लक्ष देणे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. त्यांना रोज पाणी घालणे, निगा राखणे आदी कामे लक्ष देऊन केली पाहीजे, देशी झाडे लावण्यावर भर द्या. उद्याच्या काळात हरित बारामती बनेल असे प्रयत्न करा,असे पवार यावेळी म्हणाले.

थोडक्यात बातम्या –

“4 गाढवं एकत्र चरत असली, तरी हुकूमशहाला भीती वाटते की…”

उद्धव ठाकरे जबरदस्त कमबॅक करण्याच्या तयारीत; घेतला मोठा निर्णय

“शरद पवार कधी घरात बसतात आणि मी पार्टी सोडून जातो”

अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे भाज्या महागल्या; दर आणखी वाढण्याची भीती

रानिल विक्रमसिंघे यांनी श्रीलंकेचे अंतरिम राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More