Top News

…आणि अजित पवारांसमोरच भिडले राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक

बारामती | राष्ट्रवादीचं होमग्राऊंड असलेल्या बारामतीमध्ये राष्ट्रवादीमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं समोर आलं आहे. आता चक्क पवार घराण्यातील नेत्यांसमोरच पक्षातील नेते भिडल्याचा प्रकार समोर आलाय.

बारामतीत अंतर्गत कुरघोड्या मोठ्या प्रमाणात सुरु असल्यानं शनिवारी अजित पवारांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत दोन नगरसेवक एकमेकांशी भिडले.

आधी दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर ही लढाई मुद्द्यांवरुन गुद्द्यांवर आल्याने अजित पवार देखील संतप्त झाले होते.

नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्याबद्दलही या बैठकीत तक्रार करण्यात आली. अजित पवारांनी सर्वांना एकदिलाने काम करण्याची तंबी दिली आहे, मात्र नगरसेवक ते कितपत पाळतात याबाबत प्रश्नचिन्हच आहे.

महत्वाच्या बातम्या-

-2009 सारखचं राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला दणदणीत यश मिळेल! 

मुंबई बंद पाडणारा लढवय्या माणूस ‘जाॅर्ज फर्नांडीस’ काळाच्या पडद्याआड

-जे आमच्यासोबत येतील त्यांच्यासोबत, नाही तर त्यांच्याशिवाय- मुख्यमंत्री

-गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश 

-नितीन गडकरी यांनी ते वक्तव्य मोदींना उद्देशूनच केलं- काँग्रेस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या