भरसभेत अजित पवारांची राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना दमबाजी

बारामती | गटबाजी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी चांगलंच दमात घेतलं. सगळ्या 20 जणांचे राजीनामे घेईन आणि तिथं नव्याने राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आणेन, असं त्यांनी म्हटलंय. 

निवेदनावर सह्या करुन माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करु नका. मी फक्त पवार साहेबांचं ऐकतो. कुणीही सोम्या-गोम्या उठला आणि मला सांगायला लागला तर मी ते खपवून घेणार नाही, असं ते म्हणाले. 

दरम्यान, गटबाजी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आयुष्यात कुठलंही पद मिळणार नाही, नाहीतर पवारांची औलाद सांगणार नाही, असंही ते यावेळी म्हणाले.