नागपूर | श्री शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंनी केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत चांगलाच समाचार घेतला. भिडेंना अटक करा, अशी मागणी त्यांनी केली.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांपेक्षा मनू हा एक पाऊल पुढं होता, असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडेंनी केलं होतं. हा मुद्दा अजित पवारांनी विधानसभेत उपस्थित केला.
सरकारचा मनुवादी विचारांना पाठिंबा आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ज्ञानोबा आणि तुकोबांना कमी लेखणाऱ्याला त्यांची जागा दाखवायला पाहिजे, असंही ते यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या–
-मनसेला आणखी एक धक्का; महापौर ललित कोल्हेंचा भाजपमध्ये प्रवेश
-धक्कादायक!!! 99 वर्षीय वृद्धाचा 10 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार
-मी वारी केली नाही, पण कधी अनादरही केला नाही- शरद पवार
-संतांपेक्षा मनुस्मृती श्रेष्ठ नाही; भुजबळांचा भि़डेंवर निशाणा!
-गोपाळ शेट्टींचे काय चुकले?; सामनाच्या अग्रलेखात भाजप खासदाराची पाठराखण