मुंबई | नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्याबाबत राज्य सरकारमध्ये मतभेद असल्याचं स्पष्ट झालं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सीएएला विरोध होत असताना या कायद्याविरोधात प्रस्ताव आणण्याचा कोणताही विचार नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
अजित पवारांनी सीएएबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीमुळे कोणालाही त्रास होणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. आम्हालाही तसंच वाटतं, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
केरळ, राजस्थान, पंजाब आणि पश्चिम बंगालमध्ये एकाच पक्षाचं सरकार आहे, अशी परिस्थिती महाराष्ट्रात नाही. याठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचं मिळून महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे किमान समान कार्यक्रमावर आम्ही पुढे जात आहोत, असं अजित पवार म्हणाले आहेत.
हे सरकार चालवण्यासाठी सर्व विचार करुन आम्ही पुढे जात आहोत. महाराष्ट्रात सीएए आणि एनआरसीचा कोणालाही त्रास होणार नाही अशी आमची भूमिका आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत. दरम्यान, सरकारच्या भूमिकेमूळे राज्यात सीएएविरोधात प्रस्ताव येण्याची शक्यता कमी आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
मी तर आता काहीही बोलण्याच्या आधी पन्नासवेळा विचार करतो- अजित पवार
“काळोखात पाप करू नका, काय असेल ते उजेडात करा”
महत्वाच्या बातम्या-
“आधी विरोधक बंद पुकारायचे अन् आता सरकारच बंद पुकारत आहेत”
शिवभोजनासाठी भलीमोठी रांग; गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांचा बंदोबस्त
“अरविंद केजरीवाल हे दहशतवादीच आहेत”
Comments are closed.