बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्य सरकार पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करणार नाही?, अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण

सोलापूर | केंद्र सरकारने काही दिवसांपुर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात करण्याचा महत्त्वपुर्ण निर्णय घेतला होता. त्यानंतर इंधनाच्या किंमती काही प्रमाणात कमी झाल्या. तसेच केंद्रापाठोपाठ देशातील अनेक राज्यांनी आपले कर कमी करण्यास सुरुवात केली व नागरिकांना दिलासा दिला.

महाराष्ट्र सरकारने या बाबत कोणताही निर्णय जाहिर केला नव्हता. तसेच कर कपातीबाबत सतत राज्य सरकारवर विरोधीपक्ष भाजपकडून टीका होत असताना पाहायला मिळत होती. त्यातच पेट्रोल आणि डिझेलवरील कर कपातीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मोठं विधान केलं आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त ते आज पंढरपुर दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

महाराष्ट्राला सध्या दुसरं कोणतं उत्पन्नाचं साधन नाही, त्याचबरोबर पगार आणि दैनंदिन खर्च मात्र तसाच आहे. त्यामुळे सध्यातरी इंधनावरील कर कपात शक्य नसल्याचं स्वत: उपमुख्यमंंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. आगामी अधिवेशनापुर्वी जर करामध्ये कपात करायची असेल तर किती नुकसान सहन करावं लागेल, याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, अजित पवारांच्या या स्पष्टीकरणामुळे तुर्तास तरी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती महाराष्ट्रात कमी होणार नाही, असं चित्र स्पष्ट झालं आहे. आज अजित पवार यांनी सपत्निक पंढरपूर येथे कार्तिकी एकादशीनिमित्त पुजा पार पाडली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांबाबतही भाष्य केलं.

थोडक्यात बातम्या

वयाच्या 100 व्या वर्षी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंची प्राणज्योत मालवली

आता आधी पैसे मगच वीज, ठाकरे सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत

भाजपचा मोठा निर्णय?, चित्रा वाघ यांच्यासाठी आनंदाची बातमी

मुंबईतील कोरोना रूग्णसंख्येत चढउतार सुरूच, पाहा आजची आकडेवारी

महाराष्ट्रातील आजची कोरोना रुग्णसंख्या जाणून घ्या एका क्लिकवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More