Ajit Pawar Birthday | अजित पवार सर्वाधिक वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत आणि सध्या त्यांची उपमुख्यमंत्रीपदाची पाचवी टर्म आहे. किती वेळ उपमुख्यमंत्री राहणार? मुख्यमंत्री केव्हा होणार? असा प्रश्न त्यांनाच पडला आहे. अजितदादांच्या समर्थकांनीही अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत वाटतं. अजित पवार यांच्या 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने अजित पवार यांच्यासाठी त्यांच्या समर्थकांनी एक अनोखा केक कापला आहे. या केकवर लिहिलं होतं की, “मी अजित आशा- अनंतराव पवार, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…”, अशातच आता या केकची चर्चा ही संपूर्ण पुणे शहर आणि राज्यात आहे. (Ajit Pawar Birthday)
अजितदादांनी काही वर्षांआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 40 आमदारांना सोबत घेतलं. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हावर दावा केला. दरम्यान याआधीही अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाची संधी असुनही त्यांना संधी देण्यात आली नाही. (Ajit Pawar Birthday)
केक कापताना अजित पवारांचा व्हिडीओ व्हायरल
अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याची बॅनरबाजी करण्यात आली होती. तसेच त्यांची बहीण आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची देखील भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरबाजी करण्यात आली होती. अशातच मुख्यमंत्री पदाचा मजकूर अजित पवारांच्या केकवर लिहिण्यात आला होता. त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. (Ajit Pawar Birthday)
अजित पवार यांचा वाढदिवस…कार्यकर्त्यांनी बनवला शपथविधी सोहळा…@MumbaiNCP @AjitPawarSpeaks #NCP pic.twitter.com/cx5TQqj1xE
— jitendra (@jitendrazavar) July 21, 2024
अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीचा मजकूर असलेला केक आपल्या वाढदिवसाआधीच कापला. अजित पवारांच्या समर्थकांनी हा केक कापला. तसेच अजितदादांनी तो केक खाल्ला. केकवरील मजकूर वाचून अजितदादांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य देखील लपलेले नाहीत. (Ajit Pawar Birthday)
News Title – Ajit Pawar Birthday Cake On CM Shapath Vidhi Content
महत्त्वाच्या बातम्या
नागपुरात पावसाचा कहर! गावांना पाण्याचा वेढा, शहरात वीजपुरवठा खंडित; नागरिकांचे हालच हाल
गुजरातमध्ये शाळेची भिंत कोसळली, मुलं पहिल्या मजल्यावरून थेट..; घटनेचा थरारक VIDEO व्हायरल
“UPSC सारख्या प्रक्रियेत गडबड म्हटल्यावर..”; पूजा खेडकर प्रकरणी प्रियंका गांधी संतापल्या
मुंबईकरांनो काळजी घ्या! हवामान विभागाकडून मोठी माहिती समोर
अजितदादा-शरद पवार पुन्हा एकत्र येणार?, अजित पवार गटातील आमदाराचं सूचक विधान