बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…त्याआधीच अजित पवारांनी आरक्षण रद्द केलं’; गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप

सातारा | गेल्या काही दिवसांपासून ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. दोन महिन्यांपूर्वी मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना ठाकरे सरकारने पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावरून भाजप आणि ठाकरे सरकारमध्ये चांगलंच वाकयुद्ध पहायला मिळालं. त्यावेळी काँग्रेसने देखील ठाकरे सरकारच्या निर्णयाला विरोध केला होता. अशातच आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

अजित पवारांनी कायद्याची कोणतीही बाजू ऐकूण न घेता भटके आणि विमुक्त आघाडीचे आरक्षण रद्द केलं. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय यायच्या आधीच राज्य सरकारने समिती गठीत केली आणि या समितीचे अध्यक्ष अजित पवार यांनी न्यायालयाच्या निकालाआधीच आरक्षण रद्द केलं, असा आरोप गोपीचंद पडळकरांनी केला आहे.

भटके आणि विमुक्त जातींना आरक्षण देण्यात यावं, अशा मागणीचं निवेदन गोपीचंद पडळकर यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात दिलं आहे. त्यावेळी गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांवर निशाणा साधला. 2004 पासून संविधानिक आरक्षण असताना राज्य सरकारने 7 मे रोजी आरक्षण रद्द केलं. या सरकारने आकस बुद्धीने भटक्या आणि विमुक्त जातींवर अन्याय केल्याची टीका देखील पडळकरांनी यावेळी केली आहे.

दरम्यान, लखीमपूर घटनेचा तपास आता सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखेखाली होत आहे. प्रकरण हाताळण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सक्षम आहेत. महाराष्ट्रातील नेत्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे लक्ष द्यावं, असंही पडळकर यावेळी म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

रवी राणांची आमदारकी जाणार?, रवी राणा म्हणतात…

…जेव्हा नितीन गडकरी सामान्य माणसाप्रमाणे रांगेत उभे राहतात; पाहा व्हिडीओ

अजित पवारांच्या आदेशानंतरही महाविद्यालयं उघडली नाहीत, कारण…

“वारकरी सांप्रदायाचा पाठिंबा म्हणजे साक्षात विठोबा-रखमाईचे आशीर्वादच”

“आई-वडिलांनी बिग बॅासमध्ये जाऊ नको म्हणून सांगितलं होतं, पण…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More