Ajit Pawar | बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी पवार विरूद्ध पवार लढत पाहायला मिळत होती. या लढतीत सुप्रिया सुळे मताधिक्याने विजयी झाल्या. बारामतीत सुप्रिया सुळेंच्या अभिनंदनाचे बॅनर्स झळकवले होते. त्यामध्ये युगेंद्र पवार यांचा देखील फोटो लावला गेला होता. त्यामध्ये ‘वादा तोच दादा नवा’, अशा आशयाचे बॅनर्सवर स्लोगन लिहिण्यात आलं होतं. त्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. मात्र याच बॅनरवरून अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेत्याने प्रत्युत्तर दिलं आहे.
बारामतीत बॅनर वॉर
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी बारामतीत लावण्यात आलेल्या बॅनबाजीवरून प्रत्युत्तर दिलं आहे. अमिताभ बच्चन हा अमिताभ बच्चन असतो. त्याजागी जर आसरानी गेला तर पिक्चर किती फ्लॉप जाईल हे काय सांगायची गरज नाही. एखादा चित्रपट फ्लॉप झाला म्हणून अमिताभ बच्चन यांची उंची कमी होत नाही. त्यामुळे एकच दादा अजितदादा आहेत. दुसरा कोणी दादा होणार नाही, असं उमेश पाटील म्हणाले आहेत. (Ajit Pawar)
बारामतीकरांनी एकच विचार केला होता की लोकसभेत पवारांना पाठवायचं. तसेच विधानसभेतही पवारांनाच पाठवायचं आहे. पवारसाहेबांचं वय आणि योगदान पाहता त्यांना दुखवायला नको म्हणून बारामतीकरांना त्यांना मत दिलं. अजितदादांनी (Ajit Pawar) बारामतीकरांना काय दिलं हे बारामतीकरांना माहितीये.
रोहित पवार यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर
तसेच त्यानंतर उमेश पाटील यांनी रोहित पवार यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलं होतं. रोहित पवार म्हणाले की आता अजित पवार गटाचे नेते हे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढतील. त्यावर उमेश पाटील म्हणाले की रोहित पवार हे एका विजयाने हुरळून गेले आहेत. अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडून किंवा भाजपकडून आला नाही.
दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघात आता युगेंद्र पवार यांची बॅनरबाजी करण्यात आली आहे. यामुळे आता पुन्हा एकदा काका आणि पुतणे हे विधानसभा मतदारसंघातून आमने-सामने येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सुप्रिया सुळेंच्या प्रचारावेळी युगेंद्र पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघात फिरले आहेत. त्यामुळे त्यांनी स्वत:चा ही प्रचार केला असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही.
विधानसभेची तारीख अद्यापही समोर आली नाही. तरीही राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे वेध लागल्याचं दिसून येत आहे. तसेच बारामतीकरांनी लोकसभेला सुप्रिया सुळे आणि विधानसभेला अजितदादांना मत देणार असल्याचं सांगितलं होतं.
News Title – Ajit Pawar Closest Umesh Patil On Yugendra pawar Banner Slogon
महत्त्वाच्या बातम्या
राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याच्या घरात उभी फूट, सख्खे भाऊ आले आमने-सामने
विजयी हॅट्रिकसह नितीन गडकरी तिसऱ्यांदा बनले कॅबिनेट मंत्री!
राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरींचा तिसऱ्यांदा मंत्रिमंडळात समावेश!
‘मैं नरेंद्र दामोदरदास मोदी…’; सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींनी घेतली पंतप्रधानपदाची शपथ
भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचं मोठं वक्तव्य, म्हणाला…