मुंबई | विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन मुंबईत चालू आहे. सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना चिमटे काढले आहेत.
राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सभागृहात सादर होण्यापूर्वीच अर्थमंत्र्यांच्या ट्विटर अकाउंट वरून फुटला, असं का झालं तर, तर गेल्यावेळी अर्थराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी कमी वेळात अर्थसंकल्प वाचला आणि त्यांचीच हेडलाईन गेली. म्हणून यावेळी मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प वाचत असतानाच आपल्या ट्वीटवरून जहिराती तयार करून ठेवल्या आणि त्या अपलोड केल्या, असे चिमटे अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना काढले.
भाजप शिवसेनेमध्ये श्रेयवादाची लढाई सारखी चालू असते मात्र त्यांच्या श्रेयवादाच्या लढाईत नियमांचा भंग होतो, अशी टीका अजित पवार यांनी केली.
दरम्यान, अर्थसंकल्प सभागृहात सादर होण्यापूर्वीच अर्थमंत्र्यांच्या ट्विटर अकाउंटवरून फुटल्याने अर्थमंत्र्यांनी सभागृहाची माफी मागावी, अशी आक्रमक भूमिका अजित पवार यांनी घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या
-ड्रायव्हिंग लायसन्स काढणं झालं सोपं; गडकरींनी केला ‘हा’ नियम शिथील
-माझा वाघ कुठे आहे?; शहीद जवानाच्या आईने फोडला हंबरडा
-नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; म्हणाले…
-सोनाली बेंद्रेसोबतच्या अफेअरबद्दल शोएब अख्तर म्हणतो…
-शिवसेनेच्या वर्धापनदिनी मुख्यमंत्री फडणवीस असणार प्रमुख पाहुणे!
Comments are closed.