मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज मुंबई येथे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली. यावेळी अजित पवार यांनी विधानसभेला विजय आपलाच होईल. लोक सत्तेत असलेल्या लोकांना खाली खेचतील, असा विश्वास व्यक्त केला.
पराभव हा पराभव असतो पण त्याने खचून जायचं नसतं, पुन्हा लढायचं असतं…. असं म्हणत अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सकारात्मक इंजेक्शन दिलं.
कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार नाही. पक्षाचे स्वतःचे एक अस्तित्व आहे. हे अस्तित्व पक्ष कायम ठेवणार आहे. कार्यकर्त्यांनी अफवांना बळी न पडता पक्षाचे काम करावे, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
जनता लोकसभेला वेगळा विचार करत असते आणि विधानसभेला वेगळा विचार करत असते. महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुकीत लोक वेगळा विचार करतील, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या
-कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी कुठल्याही पक्षात विलीन होणार नाही- अजित पवार
-जयकुमार गोरे भाजपमध्ये प्रवेश करणार का?? त्यावर गोरे म्हणतात…
-आफ्रिकेचा खेळाडू म्हणतो विराट सर्वोत्तम खेळाडू; पण विराटला ‘ही’ गोष्ट सहन होत नाही
-शिवसेनेच्या माजी आमदाराने शिवसेनेच्या खासदाराला पाडलं- चंद्रकांत पाटील
-राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना ‘ईडीे’ने पाठवली नोटीस
Comments are closed.