मुंबई | राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे, असं वृत्त दोन दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये फिरत आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कोणत्याही परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोणत्याही पक्षात विलीन होणार नाही, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.
पक्षाचे स्वतःचे एक अस्तित्व आहे. हे अस्तित्व पक्ष कायम ठेवणार आहे. कार्यकर्त्यांनी अफवांना बळी न पडता पक्षाचे काम करावे, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित खासदारांची आणि काही महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज मुंबई येथे पार पडली.
महत्वाच्या बातम्या
-जयकुमार गोरे भाजपमध्ये प्रवेश करणार का?? त्यावर गोरे म्हणतात…
-आफ्रिकेचा खेळाडू म्हणतो विराट सर्वोत्तम खेळाडू; पण विराटला ‘ही’ गोष्ट सहन होत नाही
-शिवसेनेच्या माजी आमदाराने शिवसेनेच्या खासदाराला पाडलं- चंद्रकांत पाटील
-राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना ‘ईडीे’ने पाठवली नोटीस
-आम्ही तुमच्यासोबत का यावं??; वंचितचा काँग्रेस-राष्ट्रवादीला सवाल
Comments are closed.