माढ्याचे उमेदवार विजयसिंह मोहितेच होते पण त्यांनी फोनच उचलला नाही, अजित पवारांनी केला गौप्यस्फोट

पुणे | माढ्याचे उमेदवार विजयसिंह मोहितेच होते पण त्यांनी फोनच उचलला नाही, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला आहे.

रणजितसिंह मोहिते पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या आधी दोन दिवस आम्ही मोहिते पाटलांना फोन करत होतो, मात्र त्यांनी आमचा फोन घेतलाच नाही, असा खुलासा अजित पवार यांनी केला आहे.

आम्ही मोहिते पाटलांना तिकीट देण्याची तयारी दर्शवलेली असताना देखील रणजितसिंहांनी पक्ष सोडला, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

नगरमध्ये सुद्धा तेच झालं.. आम्ही सुजयला राष्ट्रवादीकडून उमेदवारी देत होतो पण त्यांनी घेतली नाही, असंही पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक! काँग्रेसचे हे दोन दिग्गज नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा

ठाण्यात मनसे आणि राष्ट्रवादी खेळतीय एकत्र होळी… ते ही मनसे कार्यालयात!

NSSO ने मोदी सरकारचा बुरखा फाडला! 5 वर्षात 2 कोटी पुरूष बेरोजगार झाले….

राष्ट्रवादी भाजपला म्हणते, आपला पाळणा कधी हलणार की लोकांचीच लेकरं मांडीवर घेणार…?

‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का?