बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून कोरोना प्रवीण दरेकरांच्या जवळ गेला नसेल; अजित पवारांनी पिकवला हशा

मुंबई | उपमुख्यमंञी अजित पवार आपल्या विनोदबुद्धीनं नेहमीच चर्चेत असतात. राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याच्या मुद्द्यावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अभिभाषणात चिंता व्यक्त केली होती. यावर विधानपरिषदेत बाजू मांडताना पवारांनी कोरोनाची सविस्तर आकडेवारी आणि राज्य सरकार करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यासोबतच विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना त्यांच्या जॅकेटमुळेच कोरोना झाला नसेल, असं म्हणत विधानपरिषदेत त्यांनी एकच हशा पिकवून दिला.

अजित पवार विधानपरिषदेत बोलताना म्हणाले की, “एका गोष्टीचं मला विशेष वाटतं की मुख्यमंत्र्यांना, प्रवीण दरेकरांना आणि सभापती महोदयांना कोरोना नाही झाला. विधानसभेमधील मलाही झाला, फडणवीसांनाही झाला. तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे तुम्हाला झाला नसेल किंवा प्रवीण दरेकरांचं जाकिट बघून तो जवळ गेलाच नसेल, म्हटला असेल कुठं जाकिटातून आत शिरायचं. पण तुम्हा तिघांनाही कोरोना होऊ नये अशा आमच्या नेहमीच शुभेच्छा असतील. नाहीतर उद्या कोरोना झाला तर म्हणतील तुझीच दृष्ट लागली अन् कोरोना झाला”

तसेच कोरोना झाला तर आता बऱ्याच जणांना हॉस्पिटलात जावं देखील लागत नाही. राज्यातील कोरोनाचा मृत्युदर घटला असल्याचंही पवारांनी यावेळेस बोलताना सांगितलं. आमच्या मंत्रिमंडळातील काही आमदार कोरोनाग्रस्त असल्याचा हवालाही पवारांनी आपल्या भाषणादरम्यान दिला.

दरम्यान, विधीमंडळात वैधानिक विकास मंडळाच्या मुद्द्यावरुन भाजप आणि अजित पवार यांच्यात चांगलीच जुंपल्याची पहायला मिळालं. चालू अधिवेशनात राज्यपालांनी 12 सदस्यांची नियुक्ती जाहीर करताच वैधानिक विकास महामंडळाची स्थापना करू, असं अजित पवार यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सांगितलं होतं.

थोडक्यात बातम्या – 

इम्रान ताहिरचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही पण म्हणाल, ‘खेळभावना असावी तर अशी’, पाहा व्हिडिओ

अजित पवारांविरोधात सुधीर मुनगंटीवारांचा हक्कभंग प्रस्ताव!

‘त्या’ महिलेने स्वत: अंगातील झगा काढला; अनिल देशमुखांनी सांगितलं जळगाव वसतीगृहात नेमकं काय घडलं!

अजित पवारांविरोधात सुधीर मुनगंटीवारांचा हक्कभंग प्रस्ताव!

देवेंद्र फडणवीसांनंतर आता योगी आदित्यनाथ यांनीही दिला ‘मी पुन्हा येईन’चा नारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More