‘त्या’ प्रकरणावरुन अजित पवारांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनाच फटकारलं!
मुंबई | मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राज ठाकरे यांनी तोंडाला मास्क लावलेला नव्हता. तुम्ही मास्क लावलेला नाही, असं काही पत्रकारांनी ठाकरे यांना विचारलं असता, ‘मी मास्क लावतच नाही, तुम्हालाही सांगतोय’, असं प्रत्युत्तर राज ठाकरेंनी दिलं होतं. मात्र ठाकरेंच्या याच विधानाचा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला आहे. काही नेते म्हणतात मी मास्क लावतच नाही मात्र इतरांना कोरोना झाला तर काय करायचं, असा अप्रत्यक्ष टोला पवारांनी राज ठाकरेंना लगावला आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना पवार म्हणाले की, कोरोनाविषयक नियम पाळणं गरजेचं आहे. पण काही नेते म्हणतात की मी मास्क लावतच नाही. तर असं न करता मास्क लावून काळजी घ्या. यासोबतच राज ठाकरे यांनी मास्क लावायलाच पाहिजे कारण ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे जुने मित्र आहेत, असं म्हणत पवारांनी विधानपरिषदेत एकच हशा पिकवून दिला.
कोरोनाविषयक सर्वपक्षीय सभा मुख्यमंत्र्यांनी बोलावली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे या बैठकीला मास्क न लावताच मंत्रालयात हजर झाले होते. या घटनेचा हवाला देत तुम्ही मास्क लावलेलं नाही, अशी विचारणा पत्रकारांनी केली असता, मी मास्क लावतचं नाही असं टोलवाटोलवीचं उत्तर राज ठाकरेंना दिलं होतं.
दरम्यान, राज ठाकरे आपल्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी कोरोनाच्या काळातही पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेताना नेहमीच पहायला मिळतात. यावेळेसही त्यांनी मास्क न लावल्याचं आढळून आलं आहे. मात्र राज ठाकरेंनी पत्रकारांना दिलेल्या थेट उत्तरानं ते कोरोना आहे हे मानायलाच तयार नसल्याचं दिसतं की काय अशी चर्चा सुरु झाली आहे.
थोडक्यात बातम्या-
सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक बाईक लाँच, लायसन्सची गरज नाही… किंमत फक्त…
कार्तिक आर्यन समोर येताच तिने केलं असं काही की…; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
वाढत्या कोरोनाच्या धोक्यामुळे ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा बंद
भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा; जाणून घ्या काय आहे प्रकरण
चोरट्या चीनचा रडीचा डाव; कोरोना लस बनवणाऱ्या भारतीय कंपन्या चीनच्या निशाण्यावर
Comments are closed.