बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“घरी हातात हात दिला तरी चालेल पण बाहेर मात्र लांबूनच नमस्कार करा”

बारामती | उपमुख्यमंत्री झाल्याने मी काही वेगळा झालो आहे असं काहींना वाटेल पण डॉक्टरांनीच दिलेल्या सल्ल्यानुसार हस्तांदोलन टाळून हात जोडून नमस्कार करत असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. महिलादिनानिमित्त एका आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमात अजित पवार यांच्या हस्ते आज बरेच सत्कार करण्यात आले. अनेकांनी त्यांच्याशी हस्तांदोलन करण्याचा प्रयत्नही केला. मात्र हात जोडून पवार यांनी नम्रतेने व हसत हस्तांदोलन टाळले. यावेळी पवारांनी उपस्थितांना एक सल्ला दिला.

तुम्हीही हात जोडूनच नमस्कार करा. घरी हातात हात दिला तरी चालेल पण बाहेर मात्र हात जोडूनच नमस्कार करा, असं पवार म्हणताच हास्याचे कारंजे उडले. मात्र जोपर्यंत कोरोना संपूर्णपणे जात नाही तो पर्यंत आपण हस्तांदोलन करणार नाही, असा खुलासाही अजित पवार यांनी केला.

दरम्यान, डॉक्टर एकीकडे सांगतात हस्तांदोलन करु नका आणि तुम्ही हस्तांदोलन करण्याचा आग्रह करता, असं म्हणत त्यांनी डॉक्टरांनाही चिमटा काढला.

ट्रेंडिंग बातम्या-

जन्म द्यायला आई पाहिजे, राखी बांधायला बहिण पाहिजे पण…; जागतिक महिला दिनी अशोक चव्हाणांची कविता

येस बँकेकडून ग्राहकांना मोठा दिलासा; ट्विट करून दिली ‘ही’ माहिती

महत्वाच्या बातम्या-

वंचितला खिंडार; माजी आमदारासह 44 पदाधिकारी करणार राष्ट्रवादीत प्रवेश?

…म्हणून अमृता फडणवीस ट्रोल होतात- अदिती तटकरे

अधुरी एक कहानी; ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत करत पाचव्यांदा जिंकला विश्वचषक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More