Top News आरोग्य कोरोना

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण!

मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झालीये. यासाठी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दोन दिवसांपूर्वी त्यांना थकवा आणि अंगात कणकण जाणवत होती.

अजित पवार यांच्या सांगण्यानुसार, “माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे.”

“राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन,” असंही अजित पवार यांनी सांगितलंय.

नुकतंच त्यांनी अतिवृष्टी झालेल्या भागांचा दौरा केला होता. दौऱ्यावरून आल्यानंतर पवार यांना थकवा आणि कणकण जाणवत होती.

महत्वाच्या बातम्या-

“खडसे आणि महाविकास आघाडीतील पक्ष मिळून भाजपचे राज्यातील वर्चस्व कमी करू”

मुंबई, महाराष्ट्राचं मीठ खायचं आणि नमकहरामी करायची; मुख्यमंत्र्यांचा कंगणावर हल्लाबोल

“देवेंद्र फडणवीस लवकर बरे व्हा, आम्हाला लढण्यासाठी समोर तगडा पैलवान हवा आहे”

दुसऱ्यांची पिल्लं वाईट, मग यांनी ‘श्रावणबाळ’ जन्माला घातलाय का?- नितेश राणे

राज्यातील तरूणांनी उद्योगधंद्याकडे वळावं; मुख्यमंत्र्यांचं आवाहन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या