महाराष्ट्र मुंबई

स्वातंत्र्यदिनी अजित पवारांनी कोव्हिड योद्ध्यांचे मानले आभार; म्हणाले….

मुंबई | भारताच्या 73 वा स्वातंत्र्यदिनी देशभर चैतन्याचं वातावरण पहायला मिळत आहे. मात्र कोरोनाचं संकट डोक्यावर असताना आपल्या जीवाची पर्वा न करता कोव्हिड योद्धे आजही आपली सेवा बजावत आहेत. म्हणूनच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कोव्हिड योद्ध्यांचे स्वातंत्र्यदिनी आभार मानले आहेत.

आपल्या ट्विटरवरून पवारांनी म्हटलं आहे की, भारतीय स्वातंत्र्याच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो. असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून मिळालेलं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी प्रतिज्ञाबद्ध होऊया! कोरोनाचं संकट आजवरचं सर्वात मोठं संकट असून पुढचे काही महिने प्रतिबंधक नियमांचे पालन करून आपण सर्वांनी कोरोनामुक्तीचा लढा एकजुटीनं लढूया, कोरोनाला हरवूया!

“ह्या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आघाडीवर राहून पहिल्या फळीत लढत असलेले डॉक्टर, नर्सेस ,पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलीस, अंगणवाडी ताई, आशाताई, शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज संस्थांचे अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते या सर्वांचे आभार मानतो.”

राज्यातील जनतेनंही कोरोनाविरुद्धच्या लढ्यात नियम व संयम पाळून सक्रीय योगदान दिलं आहे. हे योगदान महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. आपण सर्वांनी एकजूट होऊन देशाला समृद्ध, बलशाली देश बनवण्याचा निर्धार करूया!, असा आशावादही त्यांनी यावेळेस व्यक्त केला आहे.

तसेच देशाचं स्वातंत्र्य, एकता, अखंडता, सार्वभौमता, लोकशाही मुल्ये अबाधित राखणं ही आपली जबाबदारी असून. ती पार पाडण्यासाठी आजवर अनेक सुपुत्रांनी सर्वोच्च त्याग केला. अमूल्य योगदान दिलं. त्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पवारांनी राज्यातील नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

महत्वाच्या बातम्या-

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पोलीस पदकांची घोषणा, महाराष्ट्रातील 58 पोलिसांना पुरस्कार जाहीर

सुशांतच्या खात्यातील 15 कोटी कुठं गेले?; एक ‘मोठा’ व्यवहार माहीत झाला आहे!

अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना योग्य ते प्रत्युत्तर दिलं जाईल- रामनाथ कोविंद

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा योगायोग, की… या गोष्टीची एकच चर्चा

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल कोरोनाबाधित

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या